बेंगळूर/प्रतिनिधी कर्नाटक सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू मागे घेतला आहे. मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी एका निवेदनात म्हटले आहे की जनतेच्या आक्रोशानंतर त्यांनी अधिकारी आणि मंत्र्यांची बैठक घेतली आणि रात्रीचा कर्फ्यूचा आदेश मागे घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कर्नाटकात आता रात्रीची संचारबंदी असणार नाही. बुधवारी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी २४ डिसेंबर ते २ जानेवारी रोजी रात्री ११ ते सकाळी ५ या दरम्यान रात्री कर्फ्यूची घोषणा केली होती.
Previous Articleबेंगळूर: स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्यांची कामे लवकरच पूर्ण होणार
Next Article आयपीएलमध्ये आता खेळणार 10 संघ ; बीसीसीआयचा निर्णय









