बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी गुरुवारी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात अनुकूलता दर्शविली. राज्यात कोविड -१९ मधील घटनांमध्ये वाढ होत असून बुधवारी कोरोना रुग्णांची संख्या ५० हजाराच्या वर गेली आहे. “राज्यातील आजची परिस्थिती पाहता, त्याबद्दल गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” संपूर्ण लॉकडाऊन करण्यावर विचार करण्याची गरज असल्याचे गौडा म्हणाले.
“महाराष्ट्रात संपूर्ण बंद ठेवल्यामुळे मुंबईत कोरोना प्रकरणे १० हजारावरून दोन हजारावर आली आहेत. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने असेही निदर्शनास आणून दिले आहे की मुंबई-प्रमाणे लॉकडाऊन देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी केले जावेत जेथे प्रकरणे अधिक आहेत, ” असे म्हणत गौडा यांनी लक्ष वेधले. “माझ्या मते, उपजीविकेपूर्वी आपल्याला जीव वाचविणे आवश्यक आहे. म्हणून प्राधान्याने जीव वाचवण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची गरज आहे. ”
बेंगळूरमध्ये कडक उपाययोजना लागू करूनही कोविड -१९ रुग्णांची संख्या जिल्ह्यात वाढत असल्याचे गौडा म्हणाले. ग्रामीण भागात प्रकरणे पसरत आहेत. “बेंगळूरमध्ये ज्या प्रकारे कडक नियम लागू केले त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांतही आम्हाला तेवढेच गांभीर्य हवे आहे,” असे त्यांनी सांगितले. मुख्यमत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी जिल्हा मंत्र्यांना उपाययोजना करण्याचे पूर्ण अधिकार दिल्याबद्दल ते म्हणाले. कर्नाटकात लॉकडाऊनचा गोंधळ वाढत आहे. सध्या, कर्नाटकचा २ आठवड्यांचा ‘क्लोज डाउन’ १२ मे रोजी सकाळी ६ वाजता संपणार आहे.