राज्य सरकारकडे २ हजारहून अधिक व्हेंटिलेटर पडून
बेंगळूर/प्रतिनिधी
पंतप्रधान केअर फंडांतर्गत राज्य सरकारकडे एकूण २,१४९ व्हेंटिलेटरपैकी २,०२५ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. म्हणजेच सध्या शासकीय रुग्णालयात व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही. खासगी रुग्णालयांना विशेष योजनेंतर्गत व्हेंटिलेटर देण्याची राज्य सरकारची इच्छा आहे. सरकार व्हेंटिलेटर रुग्णालयांना कर्जावर देणार आहे.पण ही व्हेंटिलेटर्स रुग्णालयांनी शासनाने दिलेल्या संदर्भित रूग्णांच्या उपचारासाठी वापर करायचा आहे. परंतु खासगी रुग्णालयांनी सरकारच्या प्रस्तावावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आतापर्यंत केवळ पाच खासगी रुग्णालये पुढे आली आहेत. कोविड रूग्णांच्या उपचारामध्ये व्हेंटिलेटर पेक्षा जास्त फ्लो ऑक्सिजनची आवश्यकता असते.
आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. एम. डॉ. सेल्वराज यांनी राज्यातील सर्व खाजगी रुग्णालयांना माहिती देऊनही व्हेंटिलेटरची मागणी केलेली नसल्याचे म्हंटले आहे. आरोग्य आयुक्त पंकजकुमार पांडे यांनी आरोग्य विभागाने २३ सप्टेंबर रोजी खासगी रुग्णालय व्यवस्थापनाला व्हेंटिलेटर योजनेबाबत माहिती देण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. परस्पर समर्थनाच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर रुग्णालये सहा महिन्यांपर्यंत व्हेंटिलेटर घेऊ शकतात.
खासगी रुग्णालये व नर्सिंग होम असोसिएशनचे (पीएचएनए) अध्यक्ष डॉ. आर. रविंद्र यांनी मे-जूनमध्ये व्हेंटिलेटरची मागणी सर्वाधिक होती. परंतु आता व्हेंटिलेटर पेक्षा अधिक उच्च फ्लो ऑक्सिजनची आवश्यकता आहे. प्रशिक्षित नर्स आणि इतर कर्मचार्यांचा अभाव ही व्हेंटिलेटर न घेण्याची इतर कारणे आहेत. गुरुवारी पर्यंत १४९ सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध ५०५ आयसीयू व्हेंटिलेटर बेड पैकी ११० बेड रिक्त आहेत. यातील १०८ बेड खासगी रुग्णालयात होते.
डॉ. सेल्वराज यांनी राज्यात कोविड रूग्ण वाढत असल्याने अतिरिक्त व्हेंटिलेटरची आवश्यकता भासणार आहे. अंदाजानुसार १५ ऑक्टोबरपर्यंत संक्रमणाची एकूण संख्या सात लाखांवर पोहचू शकते. रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर मिळण्यासाठी शक्य तितक्या लवकर अतिरिक्त व्हेंटिलेटर उपलब्ध करणे आणि त्यांचा वापर सुरू करणे आवश्यक असल्याचे म्हंटले आहे.