बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर, उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनारायण, मुख्य सचिव टी. एम. विजय भास्कर यांनी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या वतीने व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतला.
बेंगळूरमध्ये कोरोनाव्हायरस संसर्गातून बरे झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री अलग राहिले आहेत. रुग्णालयात आठवडाभर उपचार घेतल्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या अनुपस्थितीत या मंत्र्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीविषयी आढावा बैठकीत सहभाग घेतला होता.