बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील अनेक वैद्यकीय महाविद्यालयांवर बुधवारी प्राप्तिकर विभागाने (आय-टी) छापा टाकल्यामुळे एमबीबीएस, बीडीएस आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेशात गैरप्रकार होत असल्याचे आढळले आहे. छापे टाकले असता फीच्या नावावर ४०० कोटींपेक्षा जास्त रकमेची रोकडही सापडली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी दिली. मेडिकल कॉलेजांसह शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या बेंगळूर आणि मंगळूर येथे नोंदणीकृत नऊ प्रमुख विश्वस्तांवर छापे टाकण्यात आले.
१५.९ कोटी, ८१ किलो सोन्याचे दागिने (३० कोटी रुपये किंमतीचे), ५० कॅरेटचे हिरे आणि ४० किलो चांदीचे साहित्य विश्वस्तांच्या रहिवासी आवारात सापडले आहेत. घानामध्ये २.३९ कोटी रुपयांची अघोषित परकीय मालमत्ता असल्याचा पुरावा सापडला आहे. तसेच व्यतिरिक्त बेनामी नावाने ३५ लक्झरी कारमध्ये प्रचंड गुंतवणूक केल्याचे आढळले आहे.
बेंगळूर, तुमकूर, दावणगिरी आणि मंगळूर येथील अनेक वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या विश्वस्तांच्या निवासस्थानाची बुधवारी छापेमारी करण्यात आली आहे.









