बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानपरिषदेने बुधवारी रात्री उशिरा कर्नाटक कृषी उत्पन्न विपणन (नियमन आणि विकास) (दुरुस्ती) विधेयक २०२० मंजूर केले, काँग्रेसने या विधेयकाला विरोध करत काँग्रेस आमदारांनी सभागृह सोडले.
कर्नाटक कृषी उत्पन्न विपणन (नियमन आणि विकास) दुरुस्ती विधेयक २०२० हे एपीएमसी कायद्यात बदल करण्याच्या केंद्रीय कायद्याची राज्य आवृत्ती आहे आणि त्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमेवरपंधरादिवसांपासून निषेध करत आहेत.
दरम्यान मंगळवारी भाजपने जद (एस) च्या पाठिंब्याने राज्य विधानपरिषदेत जमीन मालकी सुधारणा विषयक विधेयक मंजूर केले, परंतु कॉंग्रेसने या विधेयकाविरूद्ध मतदान केले होते.
सुधारित कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन एपीएमसी मार्केटच्या बाहेर विक्री करता येईल. सप्टेंबरमध्ये कर्नाटक विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले. त्यावेळी विरोधकांनीही या कायद्याला शेतकरीविरोधी असे लेबल लावून वॉकआऊट केले होते.