रेल्वे रुळाजवळ आढळला मृतदेह
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानपरिषदेचे उपाध्यक्ष एस.एल. धर्मेगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. धर्मेगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिक्कमंगळूर जिल्ह्यातील कडूर तालुक्यातील गुणसागाराजवळ जेडीएसचे आमदार आणि विधानपरिषदेचे उपाध्यक्ष धर्मेगौडा रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळले. धर्मेगौडा सोमवारी घरातून बाहेर पडले ते घरी परतलेच नाहीत. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान सोमवारी संध्याकाळी ते आपल्या कारमधून गावात शेताबाहेर गेले होते. घरी परत आले नसल्याने कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला होता आणि अखेर मंगळवारी पहाटे त्यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला.
एवढे मोठे टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी धर्म गौडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी यावर मी विश्वास ठेवू शकत नाहीत. मी प्रार्थना करतो की परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि कार्यकर्त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हंटले आहे.









