बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी राजधानी बेंगळूरसह राज्याच्या विविध भागात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन पुढे वाढविण्यात येणार नसल्याचे म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आज मंत्री, खासदार आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली.
बंगळूरमध्ये खासदार, मंत्री आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी “लॉकडाउन हे कोरोना संकटांवर उपाय नाही. यापुढे आम्ही लॉकडाउन वाढवणार नाही. ” असे म्हंटले आहे. आठवड्याच्या सुरुवातीला कर्नाटक कोविड -१९ टास्क फोर्सबरोबर बैठक झाली होती. यावेळीहीत्यांनी असे म्हंटले होते.