गाडीवरून भाजीपाला व फळविक्री सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने राज्यात १४ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार १२ मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल. लॉकडाऊनची अंमलबजावणी मंगळवारी रात्रीपासून सुरु झाली आहे. दरम्यान सरकारच्या नव्या मार्गसुचीनुसार सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा आणि किराणा दुकानं तसेच एपीएमसी भाजी मार्केट, मंडई सुरू राहणार आहे. तसेच गाडीवरून भाजीपाला व फळविक्री सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. तसेच राज्यात सर्वत्र सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत किराणा व्यवहार आणि सेवा सुरू राहणार आहे.
पूर्वी या कामांना सकाळी ६ ते सकाळी १० या वेळेतच परवानगी होती. सकाळी ६ ते सकाळी १० या दरम्यान लोक मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा नवीन आदेश आला आहे.
तसेच, “गर्दी रोखण्यासाठी सरकारने सर्व प्रकारच्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे, असे प्रधान सचिव (महसूल) आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीचे सदस्य-सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी आपल्या आदेशात, आदेशानुसार कोविड -१९ प्रोटोकॉलचे पालन करत फळ आणि भाज्या विक्री करणाऱ्यांनी बाजारभावापेक्षा जास्त शुल्क आकारले जाऊ नये, असे म्हंटले आहे. कर्नाटकने २६ एप्रिलला दोन आठवड्यांचा ‘क्लोज डाऊन’ जाहीर केला असून १२ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत लागू असणार आहे.