बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा मंगळवारी यांनी लसीच्या कपात्रतेविषयी बोलताना त्यांनी राज्यात लस आल्यापासून लसीची कमतरता भासली नसल्याचे म्हंटले आहे. नागरिकांनी “घाबरून जाण्याची गरज नाही किंवा रात्रभर रांगेत उभे राहण्याची गरज नाही. लोकांना कोणत्याही कमतरतेची भीती बाळगण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंगळवारी आरोग्य सौधा येथील कोविड वॉर रूमला भेट दिल्यानंतर पत्रकारांना सांगितले.
वॉर रूममध्ये होत असलेल्या कामाचे कौतुक करताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी, बदल आवश्यक असल्यास सरकार युद्ध कक्षातील कामांचा आढावा घेईल. “डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज देण्यास सांगितले तरीही ५०३ रुग्ण २० दिवसांहून अधिक काळ रुग्णालयातच राहतात. त्यांच्यावर घरी उपचार सुरु ठेवण्यास सांगितले पाहिजे जेणेकरून हे रिक्त झालेले बेड गरजूंना वाटप करता येईल. मी त्यांना कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. “वॉर रूममध्ये उपलब्ध असलेल्या आकडेवारीमुळेच या गोष्टी आता ज्ञात आहेत,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधा येथे कोविड केअर सेंटर म्हणून रुपांतरित करण्याच्या प्रस्तावाविषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबत अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नसल्याचे सांगितले.