हसन/प्रतिनिधी
हसन जिल्ह्यातील अलूर तालुक्याच्या सीमेवरील एका ठिकाणी रेव्ह पार्टी सुरु होती. दरम्यान यावेळी पोलिसांनी छापा टाकत रेव्ह पार्टीत सहभागी असणाऱ्या १३० जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यांनतर पोलिसांनी शनिवारी रात्री घटनास्थळावर छापा टाकला आणि परिसरातून दारू, गांजा व इतर अमली पदार्थ जप्त केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पार्टीला बेंगळूर, मंगळूर, गोवा आणि इतर ठिकाणांहून लोक सहभागी झाले होते. पोलिसांनी उपस्थितांची वाहनेही ताब्यात घेतली आहेत.









