बेंगळूर/प्रतिनिधी
देशात बऱ्याच राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. बऱ्याच ठिकाणी रेमडेसिवीर खरेदीसाठी ग्राहकांच्या दुकानासमोर रंगाच्या रंगा लावग आहेत. दरम्यान कर्मतकात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा असतानाही कमतरता भासत असल्याने गृहमंत्र्यांनी रेमडेसिवीरचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान कोरोनाच्या उपचारासाठी अत्यावश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराविषयीचे वृत्त समोर येत असताना कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी गुरुवारीऔषधांची कमतरता निर्माण करणार्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला. कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी याआधीच सांगितले आहे की राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची कमतरता नाही परंतु राज्यात चुकीची टंचाई निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.