बेंगळूर/प्रतिनिधी
बुधवारी कर्नाटकात कोरोना तपासणीची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. एका दिवसात ९४,८८६ लोकांची कोरोना तपासणी झाली. दरम्यान बुधवारी राज्यात ८,८५६जणांचा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सर्वात जास्त संसर्ग बाधित रुग्ण राजधानी बेंगळूरमध्ये सापडले. बेंगळूरमध्ये बुधवारी ४,२२६ कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर राज्यात कोरोनोला पराभूत करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या ८, ८९० होती. राज्यात बुधवारी एकूण ८७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,०७,६१६ सक्रिय रुग्ण आहे.









