बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी ६७४ नवीन कोविड -१९ रुग्णांची भर पडली. तसेच ८१५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळविला. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९,३४,२५२ वर पोहोचली आहे. यापैकी ९,१४,४९२ रुगांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७,५५४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या १२,१८७ वर पोहचली आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. गुरुवारी जिल्ह्यात ३७१ नवीन संक्रमित रुग्णांची भर पडली. तर एकाचा मृत्यू झाला.
राज्यात आतापर्यंत एकूण १,६३,०६६०८ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यापैकी ८८,८५५ नमुन्यांची चाचणी गुरुवारी करण्यात अली आहे.









