बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी १,२३६ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तसेच १४९७ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या ९,०५,९०१ वर पोहोचली आहे. तर यापैकी ८,७८,६९६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या १५,२०५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी २२९ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. गुरुवारी राज्यात १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोविडमुळे राज्यात आतापर्यंत ११,९८१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात राज्यात एकूण १,०६,३५६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली, त्यामध्ये १३,६६६ जलद प्रतिजैविक आणि ९२,६९० आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत. जिल्ह्यात गुरुवारी ६८९ रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्णांची संख्या ३,३०,९३६ वर गेली आहे. यापैकी ३,६६,४४५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. आतापर्यंत ४,२५२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील सात मृत्यूची गुरुवारी पुष्टी झाली.









