बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. सरकार कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करत असून देशात तिसऱ्या टप्प्यात लसीकरण मोहीम सुरु आहे. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची वाढ कमी जास्त होत आहे. सोमवारी राज्यात ४३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मागील आठवढ्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग वाढ झाली होती.
राज्यात रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६०० च्या वर गेली होती. तर सोमवारी राज्यात बाधितांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली. सोमवारी राज्यातील विविध जिल्ह्यातून ४७८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६,८१५ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत १२,३६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणारे सर्वाधिक रुग्णही बेंगळूरमध्येच आहेत. दरम्यान सोमवारी जिल्ह्यात २८७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर २६८ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या वाढली असून ती ५ हजारावर गेली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,५०३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









