बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून दररोज नवीन कोरोना रुग्णांची संख्या ८००-९०० ने वाढत आहे. शनिवारी राज्यात ८९९ नव्याने कोरोना झालेल्या रुग्णांची नोंद झाली. तसेच ८७२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तर चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या एकूण सक्रियरुग्णांची संख्या ९४५२ इतकी आहे. तर राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे १२१३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात आतापर्यंत बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. शनिवारी जिल्ह्यात ४६५ कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच वेळी जिल्ह्यात ४४५ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तर तीन कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या ५८७६ इतकी आहे तसेच शहरी जिल्ह्यात आतापर्यंत ४३४६ रूग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.









