बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. राज्यात सध्या ८९,४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी राज्याच्या आरोग्य विभागाने जरी केलेल्या बुलेटिन नुसार राज्यात शुक्रवारी ५,३५६ नवीन कोरोना रुग्ण सापडले. यासह कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ७,९३,९०७ वर पोहोचली आहे. यापैकी ६,९३,५८४ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. शुक्रवारी ८,७४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात शुक्रवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचा दर ८७.३६ टक्के होता तर मृत्यू दर १.३६ टक्के होता.
कोरोनामुळे आतापर्यंत १०,८२१ रुग्ण मरण पावले आहेत. तर आयसीयूमध्ये ९३६ रुग्ण दाखल आहेत.
गेल्या 24 तासांत एकूण १,०८,३५६ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये २१,६१५ जलद प्रतिजैविक आणि ८६,७४१ आरटी-पीसीआर चाचण्यांचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७१,६८,५४५ कोटोन नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे









