बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात बुधवारी ४१५ नवीन कोरोना प्रकरणांची नोंद झाली. तर ३२२ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच तीन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान राज्यात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ९,४३,६२७ वर पोहोचली आहे. यापैकी ९,२५,४८९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ५८७५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आयसीयूमध्ये १४१ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात कोविडमुळे एकूण १२,२४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ६६,१९९ नवीन कोविड नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४२५६ रॅपिड प्रतिजैविक आणि ६१,९४३ आरटी-पीसीआरद्वारे चाचणी करण्यात आली.
दरम्यान राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. बुधवारी जिल्ह्यात २०८ बाधित रुग्णांची नोंद झाली. तर १४२ रुग्ण कोरोनावर विजय मिळवून रुग्णालयातून घरी परतले. सध्या जिल्ह्यात ३,८२६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे ४,४११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.