बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या घटत चालली आहे. सोमवारी राज्यात ३६८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. रोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार सोमवारी, राज्यात ४३० रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णलयातून घरी परतले. तर दोन कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात कोरोना संक्रमित उपचार घेणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या ५,७७२ आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत १२,२६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. सोमवारी जिल्ह्यात १९६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. बेंगळूरमध्ये सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या ३,८९८ आहे. जिल्ह्यात सोमवारी २२७ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले. बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४४३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









