बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी रविवारी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन राज्याच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांच्या नावावर चर्चा करून नावावर शिक्कामोर्तब करण्यास सांगितले. तसेच यावेळी मंत्रिमंडळ विस्तारबाबतही चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पक्षाने मोठ्या प्रमाणात यश संपादन केल्याचे म्हंटले आहे. महिन्याभरात दोन संसदीय आणि विधानसभा पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे उमेदवारांची नावे फायनल करायची आहेत. या सर्व बाबींवर अमित शहा यांच्याशी चर्चा केली.
गृहमंत्र्यांसोबत त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटून राज्यातील महत्वाच्या घडामोडींवर चर्चा केल्याची शक्यता आहे. आदल्या दिवशी दिल्लीला जाण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळातल्या बैठकीत चर्चेला येण्याची सूचना केली होती.