बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ब्लॅक फंगसचे १,७८४ रुग्ण असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली आहे. दरम्यान ब्लॅक फंगसवर करण्यात येणारे उपचारही महागडे आहेत. अनेक रुग्णांना ते परवडणारे नाहीत. याचा विचार करून राज्य सरकरने म्युकरमायकोसिसवरील उपचार खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान कर्नाटक सरकारने शनिवारी सांगितले की, राज्यभरातील खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसवरील उपचार खर्च कमी होईल, असे आरोग्यमंत्री सुधाकर यांनी अंगितले. संभाव्य जीवघेणा बुरशीजन्य संसर्ग, म्युकरमायकोसिस नाकातून वेगाने पसरतो आणि चेहरा, जबडा, डोळे आणि मेंदूत संसर्ग होतो, ज्यामुळे रुगांना महागडे उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच रुग्णांना उपचारासाठी लांब रुग्णालयात दाखल केले जाते. शेकडो रुग्ण ब्लॅक फंगसच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च करत आहेत. काही दिवसात रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने किंमतीही वाढल्या आहेत.
आता, राज्य सरकारने वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेत त्यासाठी करावा लागणार खर्च विचारात घेऊन रुग्णांवरील उपचार खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. म्युकरमायकोसिसवरील उपचार खर्च महागडे आहेत. सामान्य नागरिकांना ते परवडणारे नाही. त्याची औषधेही खूप महाग आहेत. या सगळ्याचा विचार करता सामान्य नागरिकांना उपचार करणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने उपचार खर्च कमी करण्याचा निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा दिला आहे. दरम्यान, उपचार खर्च कमी होणार याविषयी राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी माहिती दिली आहे.