बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव आणि येलहंका विभागाचे आमदार एस.आर. विश्वनाथ यांना कोरोना यांना कोरोनाची लागण झाली आहे. विश्वनाथ यांनी कोरोना चाचणी केल्यांनतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी सोशल मीडियावर ही माहिती देताना विश्वनाथ यांनी डॉक्टरांच्या सांगण्यावरून रुग्णालयात दाखल झाले असल्याचे सांगितले आहे. गेल्या दोन दिवसात त्यांच्या सोबत सार्वजनिक सोहळ्यात सहभागी व्यक्तींना आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.









