बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी राज्यभरातील उच्चपदस्थ अधिकारी आणि जिल्हा प्रशासकांची भेट घेऊन राज्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती आणि पूरग्रस्तांच्या ठिकाणी सुरु असलेल्या कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये उपायुक्त, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि इतरांनी सहभाग घेतला.









