बेळगाव/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी बेळगाव आणि बालाकोट जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचे हवाई सर्वेक्षण केले. यावेळी महसूलमंत्री आर अशोक, गृहमंत्री बसवराज बोम्माई, जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी हे मुख्यमंत्र्यांसमवेत होते. मुख्यमंत्री येडियुरप्पा उत्तर कर्नाटकातील पूरग्रस्त जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण करत आहेत.
कर्नाटकातील काही जिल्ह्यात पावसाच्या पाण्यामुळे पूर आल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. काही ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. तर अनेक ठिकणी शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. पुराच्या पाण्यामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. यासर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.