बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे राजकीय सचिव एन. आर. संतोष यांनी शुक्रवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना उपचारासाठी एम. एस. रमैया रुग्णालयात दाखल केले आहे. संतोष हे मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक आहेत. मे महिन्यात त्यांना मुख्यमंत्र्यांचे राजकीय सचिव करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉलर कॉलनी येथील निवासस्थानी तो बेशुद्ध अवस्थेत पडले होते. कुटुंबियांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रात्री उशिरा रुग्णालयात पोहोचल्यावर या घटनेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी सकाळी आम्ही दोघे एकत्र चाललो होतो. तो निरोगी आणि आनंदी होता. हे का घडले हे मला माहिती नाही. मी त्याच्या कुटूंबाशी बोलतो, असे ते म्हणालले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर उपचारा सुरू असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी हे का केले याबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हंटले आहे.









