बेंगळूर/प्रतिनिधी
विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचे विधान फेटाळून लावत येडियुरप्पा यांचे पुत्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी गुरुवारी सांगितले की, आपल्या वडिलांनी आपली मुदत पूर्ण केली आहे. त्यांच्यावर होणारी टीका किंवा शेरेबाजी केवळ पोटनिवडणुकीतच अपेक्षा केली जावी. विरोधी पक्षांनी, विशेषत: कॉंग्रेस दोन्ही मतदारसंघात निवडणूकीत जनतेचा विश्वास जिंकू न शकल्यामुळे निराश झाला आणि म्हणूनच ते अशी विधाने करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर पलटवार करीत महसूलमंत्री आर. अशोक यांनी नवी दिल्लीहून विश्वासार्ह माहिती मिळाली असून सिद्धरामय्या जवळपास १५ दिवस विरोधी पक्षनेतेपदी असतील. त्यांनतर त्यांच्या जागी कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार असतील असा दावा अशोक यांनी केला आहे.









