बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात नुकत्याच मुसळधार झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांचे हवाई सर्वेक्षण केल्यांनतर एक दिवसानंतर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी केंद्राकडे १० हजार कोटी रुपयांची विशेष मदत मागितली आहे. यावर्षीची परिस्थिती पूर्वीच्या तुलनेत अधिक गंभीर आहे.
मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी आणि पूर यामुळे २१,६०९ कोटी रुपयांचे एकूण नुकसान झाले आहे. यावर्षी राज्याने तीनदा पूर परिस्थिती अनुभवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस आणि पूरच्या नुकसानीचा अंदाजे उल्लेख केला आहे, ज्यात ९,४४१ कोटी रुपयांचेर नुकसान झाले असल्याचे म्हंटले आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या पावसामुळे ५,५६८ कोटी रुपये नुकसान झाले होते, तर १० ऑक्टोबरपासून नुकत्याच झालेल्या नुकत्याच झालेल्या नुकसानीत सुमारे ६,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे येडीयुरप्पा यांनी म्हंटले आहे.
मुसळधार पावसाने भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आणि महाराष्ट्रातील धरणातून पाणी सोडल्यामुळे उत्तर कर्नाटक जिल्ह्यात विनाशकारी पूर आला आहे. येडीयुरप्पा ४३ हजार नागरिकांना पुरातून सुरक्षितस्थळी स्थलांतर केलं असल्याचं म्हंटल आहे.









