बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात अलिकडच्या दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी अधिकारी आणि आरोग्य तज्ञांची बैठक बोलावली आहे, अशी माहिती त्यांच्या कार्यालयाने दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक राज्य विधानमंडळ व सचिवालय असलेल्या विधान सौध येथे संध्याकाळी ५ वाजता होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने रविवारी दिलेल्या निवेदनात दिली.
22 जानेवारीनंतर पहिल्यांदाच राज्यात कोरोनाने ९०० चा टप्पा ओलांडला. त्यात एकट्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात ६३० रुग्ण आढळले आहेत. गेल्या सोमवारीपासून राज्यात ४३०० हून अधिक नवीन प्रकरणे आढळली आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढत आहे. कोरोनाचा फैलाव होऊनये यासाठी सरकार खबरदारी घेत असून मुख्यमंत्री यासाठी उद्या बैठक घेणार आहेत.









