बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना काळात प्रशासनाने नागरिकांना स्वसंरक्षणासाठी केलेल्या नियमांचे पालन कारण्याचे आदेश दिले होते. पण अनेक नागरिकांनी या नियमांचे उल्लंघन केले आहे. यामध्ये मास्क न लावणे, सोशल डिस्टंसिंग न ठेवणे, उगाच घराबाहेर पडणे अशा व्यक्तींना प्रशासनाने कारवाई करत दंड आकारलाआहे. बेंगळूरमध्ये मास्क न लावणे आणि सोशल डिस्टंसिंग न ठेवलेल्या 33,540 नागरिकांना आतापर्यंत पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांसह बीबीएमपीने, दंड ठोठावला आहे.
देशातकोरोनाचा शिरकाव होत असताना सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावेळी जीवनावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही व्यवसायाला परवानगी दिलेली नव्हती. या कालावधीत सोशल डिस्टंसिंगचे पालन न केलेल्या 118 व्यवसायिकांवर अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करत कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला आहे. बीबीएमपीने मास्क न लावता वावरणाऱ्या 31,740 जणांकडून आणि शहरात सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याबाबद्दल 1,800 जणांकडून दंड म्हणून 67.04 लाख रुपये आकारले आहेत.