बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आर. गुंडू राव यांच्या पत्नी वरलक्ष्मी गुंडू राव यांचे मंगळवारी रात्री उशिरा कोरोनाने निधन झाले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार दिनेश गुंडू राव यांच्या त्या आई देखील आहेत.
त्यांची सून तब्बू गुंडू राव यांनी फेसबुक पोस्टवर, वरलक्ष्मी यांचे कोरोनामुळे निधन झाल्याची पोस्ट केली आहे. तब्बू यांनी आमची शक्ती, आमचा मार्गदर्शक प्रकाश नेहमीच तुम्ही राहिला आहात. तुम्ही खरोखर कठोर संघर्ष केला पण कोरोनाने तुमचा बळी घेतला! आपला वर्ग, आपल्या मुलाबद्दलचा अभिमान आणि आपल्या कुटुंबासमवेत घालवलेला शेवटचा दिवस नेहमीच स्मृतीत राहील. आरआयपी अम्मा. .. तू नेहमी आमच्या हृदयात राहाशील, असे त्यांनी एका पोस्टमध्ये म्हंटले आहे.









