बेंगळूर/ प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई हे भाजपात प्रवेश करणार आहेत. कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी कर्नाटकचे माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई यांचे भाजपमध्ये स्वागत असल्याचे म्हंटले आहे.
के. सुधाकर यांनी, निवृत्त आयपीएस अधिकारी अण्णामलाई आज भाजपामध्ये सामील झाले. बंगळूरमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे सेवा दिली आहे. आता ते भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यांना पक्षात प्रवेश मिळाल्याने मला आनंद झाला. त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असे ट्विटमध्ये म्हंटले आहे.
के. अण्णामलाई यांनी आज भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष एल. मुरुगन यांच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपमध्ये सामील होतील.
माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई यांनी जवळपास दशकभर कर्नाटकात काम केले. मे 2019 मध्ये अण्णामलाई यांनी पोलीस उपायुक्त (बेंगळूर दक्षिण) पदाचा राजीनामा दिला होता.
दरम्यान, म्हैसूर-कोडागूचे खासदार प्रताप सिम्हा यांनी अण्णामलाईसह एक फोटो ट्विट करत म्हटले आहे की, काल ते अण्णामालाई यांना नवी दिल्ली येथे भेटले.
बेंगळूरचे खासदार पी.सी. मोहन यांनीही अण्णामलाईचे स्वागत केले आहे. माजी आयपीएस अधिकारी अण्णामलाई के. यांनी आपल्या अष्टपैलुपणामुळे आणि गतीशीलतेने पोलीस प्रशासनाचा चेहरामोहरा बदलला आहे. ते आज राष्ट्रीय मुख्यालयात राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधरराव आणि भाजप तमिळनाडूचे अध्यक्ष मुरुगन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये सामील होतील, असे त्यांनी ट्विट केले आहे.









