बेंगळूर/प्रतिनिधी
प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ देवी शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकार नियुक्त टास्क फोर्स कोरोनाच्या तिसर्या लहरीची तयारी करत आहे. मंगळवारी आपला अंतरिम अहवाल मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना सादर केला आणि या शिफारसींवर सविस्तर चर्चा केली.
चर्चेनंतर लगेचच मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “तृतीय कोविड लहरीतील मुलांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी समितीने काही महत्त्वपूर्ण शिफारसी केल्या आहेत. दरम्यान शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत, आम्ही निर्णय घेतला की पहिल्या टप्प्यात १८ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर उच्च शिक्षण संस्था सुरु केल्या जातील, आणि “लसीकरणात विद्यार्थी आणि शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल,” असे मुख्यमंत्र्यांनी म्हंटले होते.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून लसीकरण
दरम्यान महाविद्यालये सुरु करण्यासाठी लवकर लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यात उच्च शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून लस देणे सुरू होऊ शकते, असे उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांनी म्हंटले आहे.
डॉ.देवी शेट्टी यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीने सादर केलेल्या अहवालानंतर उच्च शिक्षण अभ्यासक्रमांसाठी वर्ग पुन्हा सुरू करण्याची शिफारस करत उच्च शिक्षण विभागाने राज्यभरातील संस्थांमधील सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना लसी देण्याचा निर्णय घेतला आहे.
उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण म्हणाले, “आम्ही बहुधा जुलैच्या पहिल्या आठवड्यात संस्था स्तरावर विद्यार्थी आणि कर्मचार्यांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.”
विभागाकडून उपलब्ध माहितीनुसार, विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासह एकूण संख्या सुमारे २० लाखांवर जाईल. “लस साठ्याच्या उपलब्धतेची माहिती दिल्यावर मोहीम सुरू होईल,” असे विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
लसीचा पहिला डोस दिल्यानंतर एका आठवड्यात पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा विचार आहे. “समितीने अशी शिफारस केली आहे की सर्व सुरक्षा उपायांसह तसेच कोविड नियमांचे लन करून ऑफलाइन वर्ग सुरू होतील.”









