बेंगळूर/प्रतिनिधी
दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बेलथांगडी येथे बुधवारी मत मोजणी केंद्राबाहेर सोशल मीडिया डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या (एसडीपीआय) काही सदस्यांनी पाकिस्तानी झिंदाबाद घोषणा दिल्या. या प्रकारामुळे मतमोजणी केंद्राबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार भाजप आणि एसडीपीआय या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येताच घोषणाबाजी करू लागले. तेवढ्यात एसडीपीआय सदस्यांनी पाकिस्तान जिंदाबाद असा जयघोष केला. घटनेची माहिती समजताच सर्कल इन्स्पेक्टर संदेश पी. जी. यांनी हस्तक्षेप करत दोन्ही पक्षातील सदस्यांना पांगविले.









