बरे झालेला रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन चिंतेत
बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या कोविड रीइन्फेक्शन प्रकरणी डॉ.के.एम.सुधाकर यांनी अधिकाऱ्यांना क्लिनिकल अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. सोमवारी विधान सौधमध्ये त्यांनी कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांशी भेट घेत याविषयी चर्चा केली. एक रुग्ण कोरोनमुक्त झाल्यांनतर त्याला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याने वैद्यकीय अधिकारी चिंतेत आहेत. अन्य देशांमध्येही पुन्हा कोरोना होण्याची प्रकरणे समोर आली आहेत आणि या देशांनीही पुन्हा कोरोना होण्याची वेगवेगळी कारणे दिली आहेत. रीइन्फेक्शनच्या विषयावर गांभीर्याने विचार करून या प्रकरणाची काळजीपूर्वक दखल घ्यावी. लोकांनी घाबरू नये असे मंत्री सुधाकर यांनी म्हंटले आहे.
टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंत्र्यांना सांगितले की कोरोनातून बरे झाल्यानंतर पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यासाठी किमान १५ दिवस लागतात. यावेळी काही रुग्णांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो. तथापि, त्यास पुनर्निर्मितीचे ठोस कारण म्हटले जाऊ शकत नाही.
यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉ सुधाकर यांनी संपूर्ण प्रकरणाचा स्पष्ट अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या. कोरोना असलेल्या इतर राज्यातील विशेष आणि पुन्हा पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रकरणांवर आणि उपचार प्रक्रियेचा अहवाल तयार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
राज्यात एका महिलेला कोरोनाची लागण झाली होती. ती जुलै महिन्यात बरी होऊन घरी परतली होती. आता ती पुन्हा ऑगस्ट महिन्यात पॉझिटिव्ह आली. २७ वर्षीय या महिलेची तपासणी केली असता तिला रीफिकेशन झाल्याचे समोर आले आहे. उपचारानंतर बरे होऊन त्या महिलेला दुसर्या वेळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.









