बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात घरांच्या अनेक योजना रखडल्या आहेत, त्यामुळे निवासी मंत्री व्ही. सोमण्णा यांनी नैतिक जबाबदारीसह राजीनामा द्यावा अशी बेंगळूर प्रदेश कॉंग्रेसचे प्रमुख ईश्वर खंद्रे यांनी केली आहे.
खंद्रे यांनी सोमण्णांची कार्यशैली चांगली नाही. त्यांनी पंचायत विकास अधिकाऱ्यांची राक्षसांशी तुलना केली. याचा निषेध म्हणून पंचायत विकास अधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन केले आणि सोमण्णा यांना माफी मागावी लागली.
सोमण्णां निवासी मंत्री झाल्यानंतर गृहनिर्माण प्रकल्पांचे काम तहकूब केले आहे. केवळ भावनिक विधानांमुळे घरांच्या लाभार्थ्यांची दिशाभूल केली जात आहे. सिद्धरामय्या सरकारने पाच वर्षांच्या कालावधीत १५ लाख घरे बांधली होती. यासाठी एकूण १५ हजार कोटी रुपये खर्च झाले. राज्यात ६.८४ लाख घरांचे काम अद्याप बाकी आहे. यासाठी शासनाने अनुदान द्यावे लागणार आहे.
तसेच सिद्धरामय्या यांची बदनामी करण्याच्या उद्देशाने भाजपा सरकारने या घरांची गुणवत्ता तपासणी करण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीला सोपवली होती आणि तपासणीनंतर व्हीजी लॅप या खासगी कंपनीने अहवाल सादर केला होता. या कंपनीने दोन लाख निवासस्थानांची गुणवत्ता तपासून अहवाल सरकारला सादर केला आहे. दोन लाख घरांची गुणवत्ता चांगली असल्याचे अहवालात म्हटले आहे. या कंपनीने अद्याप ३.६५ लाख घरांची तपासणी केलेली नाही.
ग्रामपंचायतींसाठी देण्यात आलेली २.५० लाख घरे रद्द करण्यात आली आहेत. प्रलंबित ५. १५ लाख घरांपैकी १.९० लाख घरे बांधली गेली आहेत. १.५० लाख घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. अनेक लाभार्थ्यांनी बँकांकडून कर्ज घेऊन बांधकाम सुरू केले आहे. गुणवत्तेच्या नावाखाली सरकारने ही घरे तोडून पुन्हा बांध्याने आदेश दिले आहेत असे खंद्रे त्यांनी म्हंटले आहे.









