बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी मंत्र्यांना शपथ दिल्यानंतर तीन दिवसांनी खातेवाटप केलं आहे. मुख्यमंत्री बोम्मई बोम्माई यांनी आपल्याकडे वित्त आणि बेंगळूर विकास खाते कायम ठेवलं आहे. तर, प्रथमच मंत्री झालेले अरागा ज्ञानेंद्र यांना गृह खातं देण्यात आले आहे.
मुरुगेश निरानी यांना उद्योग मंत्री करण्यात आले आहे, तर आर. अशोक जे आधी महसूल मंत्री होते, तीच जबाबदारी त्यांच्याकडे कायम ठेवली आहे. तसेच प्राथमिक शिक्षण मंत्री म्हणून बी.सी. नागेश तर एन. सुनील कुमार यांना ऊर्जा आणि कन्नड आणि संस्कृती मंत्री म्हणून संधी मिळाली आहे.
तर के. सुधाकर यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून कायम ठेवले आहे, तर अश्वथ नारायण यांनाही पुन्हा पूर्वीचे उच्च शिक्षण आणि आयटी/बीटी मंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. दरम्यान, बोम्माई वगळता मंत्रिमंडळात एकूण २९ मंत्री आहेत.
मंत्र्यांना मिळालेली खाती













