मंगळूर/प्रतिनिधी
केरळच्या कोझिकोड जिल्ह्यात १२ वर्षांच्या मुलाचा निपाह विषाणूमुळे मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूच्या एका आठवड्यानंतर, कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात सोमवारी मंगरूळ येथील एका व्यक्तीला निपाह संसर्ग झाल्याचा संशय आहे.
आरोग्य आयुक्त के. व्ही. त्रिलोक चंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळूरमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) मध्ये नमुना चाचणीसाठी पाठवेपर्यंत त्याच्यामध्ये कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नव्हती.
दरम्यान, आरोग्य आयुक्त के. व्ही. त्रिलोक चंद्र यांनी त्या व्यक्तीमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नसली तरी आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. पण घाबरण्याची गरज नाही. त्या व्यक्तीमध्ये कोणतीही गंभीर लक्षणे नाहीत त्यामुळे चिंतेचे कारण नाही. तरीही खबरदारी म्हणून प्रशासनाने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे.