गदग/प्रतिनिधी
गदग शहरातील विविध विभागांकडून भ्रष्टाचाराविरूद्ध जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. जागृत भारत, समृद्ध भारत जागृती सप्ताहाच्या निमित्ताने कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ, हेस्कम गदग, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने आरटीओ गदग कार्यालयात ही मोहीम राबविण्यात आली.
भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यासाठी यावेळी शपथ घेण्यात आली. जिल्हा शिक्षक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिरहट्टी व मुंदरगी तालुक्यातील शंभर शिक्षकांसह ऑनलाइन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कर्नाटक लोकायुक्त गदग डीएसपी रामराव के., निरीक्षक ए.आर. कलादगी, कर्नाटक राज्य परिवहन महामंडळ संस्थेचे विभागीय नियंत्रक एफ.सी. कृष्णाप्पा हेंडेगर, हिरेमठ, हेस्कमचे कार्यकारी अभियंता यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.









