शिवमोगा/प्रतिनिधी
शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावतीचे माजी आमदार एम. जे. आप्पाजी गौडा यांचे बुधवारी रात्री कोरोना संसर्गाने निधन झाले. ते 67 वर्षाचे होते. कोरोना झाल्याने त्यांच्यावर शहरातील जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर त्यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तीन दिवसांपूर्वी गौडा यांना श्वसनाच्या विकाराचा त्रास होऊ लागल्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात प्रथम दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोना चाचणी केल्यांनतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते.









