बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनी कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून मंदिरात गेले आहेत, असे कर्नाटक हायकोर्टाने शुक्रवारी सांगितले. बंदीच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी कोर्टाने राज्य सरकारला मंदिरांना सूचना करण्याचे निर्देश दिले.
सरन्यायाधीश अभय श्रीनिवास ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हैसूर डीसीच्या अहवालावर विचार केला. लॉकडाऊनच्या वेळी विजयेंद्र नांजुनागुड येथील मंदिरात गेले होते. बंदी असूनही विजयेंद्र मंदिरात गेले हे आपण मान्य करतो असे कोर्टाने म्हटले आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी यांनी विजयेंद्र यांना विशेष दर्शन घेण्याची व्यवस्था केली नसल्याची नोंदही अहवालात नोंदविण्यात आली आहे. दरम्यान, कोर्टाने बी. वाय. विजयेंद्र यांच्याकडून कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं म्हंटल आहे.
दरम्यान कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात पूर्ण लॉकडाऊन लागू केला. तसेच गेल्या काही दिवसापासून राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यामध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासावर बंदीही घालण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यातील अनेक धार्मिक स्थळंही बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र असं असतानाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांनी नियमांचं उल्लंघन करत नांजुनागुड येथील मंदिराला भेट दिली होती. विजयेंद्र कोरोना नियमांचं उल्लंघन करत मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होत. त्यांनतर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली होती.
दरम्यान, केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या उपस्थितीत बेलागावी येथे १७ जानेवारी रोजी झालेल्या भाजप मेळाव्यासंदर्भात कोर्टाने १९ जुलैपर्यंत अधिकाऱ्यांकडे अहवाल मागितला.









