बेंगळूर/प्रतिनिधी
रस्ते परिवहन महामंडळाच्या (आरटीसी) कामगारांनी संप पुकारलेला संप ११ व्य दिवशीही कायम आहे. संपावर कोणताही तोडगा निघायचं नाव नाही. आत हा परिवहन कर्मचाऱ्यांचा संप वेगळंच वळण घेत आहे. बीएमटीसीने शनिवारी संपत सहभागी झालेल्या २,४४३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
बीएमटीसीने निलंबित केलेल्यांमध्ये १,९७४ ज्येष्ठ कामगारांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत अशाच उपाययोजना सुरू राहतील, असे अधिकारी म्हणाले. दगडफेकीमुळे नुकसान झालेल्या बसेसची संख्या ७० वरून ९७ पर्यंत वाढली आहे. आतापर्यंत एकूण ८५ कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
दगडफेकीत एका कामगाराचा मृत्यू झाल्याच्या दुसर्याच दिवसानंतर शेतकरी नेते कोदीहळ्ळी चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचारी संघटना काहीच उत्तर देण्यास अपयशी ठरली आहे. दरम्यान, निलंबन आणि बडतर्फ आदेशाच्या पार्श्वभूमीवर संघटना कामगारांवरील ताबा गमावत असून चार महामंडळांनी शनिवारी ७ हजाराहून अधिक बसेस चालविण्यात यश मिळविले आहे.









