बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केल्यांनतर कन्नड समर्थक संघटनांनी ५ डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली होती. परंतु मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी शुक्रवारी मराठा विकास महामंडळ स्थापन करण्याला विरोध न करता बंद मागे घ्यावा असे आवाहन त्यांनी कन्नड समर्थक संघटनांना केले होते. परंतु कन्नड संघटनांनी बंद मागे न घेण्याचे स्पष्ट केले.
दरम्यान शनिवारी कर्नाटक बंद पुकारला असला तरी नेहमीप्रमाणे सर्व व्यवहार सुरळीत सुरु असताना पहायला मिळाले. बेंगळूरमध्ये सर्व व्यवहार, बाजारपेठ सुरु होत्या. तसेच अनेक वस्तू वाहतुकीची वाहनेही बाजारपेठेतून नियमितपणे काम करताना दिसली. अनेक संघटनांचे कार्यकर्ते शहरातील महत्त्वपूर्ण ठिकणी निषेध करण्यासाठी जमले होते. यावेळी जबरदस्तीने दुकाने बदन करण्यास सांगत असताना पोलिसांनी मात्र व्यवसाय बंद करण्यास परवानगी दिली नाही.
दरम्यान के आर मार्केट, कलासीपाल्य, मल्लेश्वरम आणि माडीवाला येथे भाजीपाला, फळे, फुले व घरगुती वस्तूंच्या विक्रीचा दररोजचा व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरु होता आणि सर्वसामान्य नागरिकांची संख्याही जास्त होती. अनेक वस्तू वाहतुकीची वाहनेही बाजारपेठेतून नियमितपणे काम करताना दिसली.
रस्त्यावर विक्री करणारे आणि अनेक भागात व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी नेहमीप्रमाणे आपली दुकाने लावली होती. दरम्यान कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) म्हटले आहे की १७ विभागांमधील त्यांचे दैनंदिन कामकाज कोणत्याही सहलींमध्ये व्यत्यय आणता सामान्य आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहर पोलिसांनी सर्व मेट्रो स्टेशन, केएसआरटीसी बसस्थानक आणि रेल्वे स्थानक जवळ अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.