बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात लोकसभेच्या एक आणि विधानसभेच्या २ जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. यामध्ये कॉंग्रेसने मस्की येथील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला आहे. सुमारे २६ हजार मतांच्या फरकाने विजय मिळविला आहे.
दरम्यान मस्की विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बसणागौडा तुर्विहाळ यांनी भाजपचे उमेदवार प्रतापगौडा पाटील यांच्या विरोधात विजय मिळविला आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे. पराभव स्वीकारल्यानंतर पाटील यांनी मतमोजणी केंद्र सोडले आहे.









