बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात विधानसभेच्या दोन आणि विधान परिषदेच्या चार भागांसाठी निवडणूक होत आहे. राजराजेश्वरीनगर आणि सिरा विधानसभा मतदारसंघ आणि चार विधानपरिषद मतदारसंघात सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार विजयी होतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार यांनी केला आहे.
दरम्यान कॉंग्रेस व जनता दलाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये सामील झालेल्या अनेक माजी नगरसेवक व नेत्यांचे स्वागत करताना त्यांनी, कॉंग्रेस आणि जनता दलाला मतदार योग्य उत्तर देण्यासाठी तयार आहेत, असे ते म्हणले.
अनिल कुमार यांनी, कॉंग्रेसमधील भांडणे शिगेला पोहोचली आहेत. पक्षातील दोन गट एकमेकांना पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, परिणामी भाजपाचा मार्ग सुकर झाला आहे. कॉंग्रेस आणि जनता दल-एस यांच्या कौटुंबिक केंद्रित राजकारणाला कंटाळून लेलले पक्षाचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे भाजप उमेदवारांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.