बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांनी मंगळवारी आर. आर. नगर आणि सिरा या दोन जागांवरहोणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी डिजिटल प्रचाराची निवड करण्याची विनंती सर्व पक्षांना केली आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी सर्व पक्षांना डिजिटल प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.
मंत्री सुधाकर त्यांनी कोरोनाचा पुढील प्रसार टाळण्यासाठी हे महत्वाचे आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. राज्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. पोटनिवडणुकीच्या प्रचारात गर्दी टाळण्यासाठी मंत्री सुधाकर यांनी डिजिटल प्रचार हा पर्याय अवलंबविण्याचे ठरवले आहे.