बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने नुकत्याच झालेल्या पुरामुळे सुमारे ८,०७१ कोटींचे नुकसान झाल्याचे म्हंटले आहे. पुरामुळे झाल्याला नुकसानाची पाहणी केंद्रीय पथकाकडून केली जात आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पिके व मालमत्तेचे नुकसान झालेल्या आकडेवारीसंदर्भात केंद्रीय टीमशी चर्चा केली. गृह मंत्रालयाचे सहसचिव के. व्ही. प्रताप यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने (आयएमसीटी) यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ मंत्र्यांसह अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.
मुख्यमंत्री कार्यालयाच्या निवेदनानुसार येडीयुरप्पा यांनी माहिती दिली की यावेळी झालेल्या पुरामुळे एकूण ८०७१ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. २०१८ आणि २०१९ मध्येही पूर आणि भूस्खलनांमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांचा नाश झाला असल्याचे सांगत त्यांनी, यावेळी सुमारे ४.०३ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. याशिवाय रस्ते, पूल, इलेक्ट्रिक पोल, शाळा, अंगणवाड्या, सरकारी इमारतींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









