बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने शाळांकरिता पुढील शैक्षणिक वर्ष १५ जुलैपासून सुरू होण्याची शक्यता आहे, असे सूचित केले. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी “राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जुलैपासून करणार आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती लक्षात घेऊन आम्ही असा निर्णय हेण्याचेर ठरविले आहे. तसेच आम्हाला राज्याती सध्याची कोविड परिस्थितीदेखील ध्यानात ठेवायची आहे, ”असे ते म्हणाले.
मंत्री सुरेश यांनी या वेळी परिस्थितीने उभे केलेले आव्हान मागील वर्षीच्या अनुभवीपेक्षा वेगळे आहे. “निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी या विषयावर अधिक चर्चा करू,” असे ते म्हणाले.
मंत्र्यांनी पुढे नमूद केले की खासगी शाळा व्यवस्थापनांकडून सरकारवर दबाव आहे की त्यांना वर्ग १ पासूनच ऑफलाइन वर्ग घेण्यास परवानगी द्यावी. “मागील वर्षी (चालू शैक्षणिक वर्ष) मध्ये ६ वी व त्यापेक्षा अधिक वर्गाच्या विद्यार्थ्यांना ऑफलाइन वर्गांना परवानगी देण्यात आली होती परंतु पुढील वर्षासाठी वर्ग १ मधील विद्यार्थ्यांपर्यंत ही वाढ करावी अशी खासगी शाळांकडून मोठी मागणी आहे,” असे त्यांनी नमूद केले.









