बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी संततधार कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पूर परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हानिहाय विशेष टास्क फोर्स गठित करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.
कुमारस्वामी यांनी मान्सूनमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मी राज्य सरकारला विनंती करतो. सरकारने युद्धपातळीवर नागरिक आणि त्यांचे पशुधन यांचे बचाव करावा यासाठी सरकारने लवकरात लवकर मदत कार्य हाती घेतले पाहिजे. असे ते म्हणाले.
तसेच कुमारस्वामी यांनी नागरिक, विशेषतः शेतकरी संकटात सापडला आहे. कोडागु आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यात मान्सूनच्या तीव्रतेने भीती निर्माण झाली आहे. पूर परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हावार विशेष टास्क फोर्सची स्थापना केली पाहिजे, असे ते म्हणाले.









