बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे परिवहन मंत्री आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी म्हणाले की, गेल्या वर्षी मार्चपासून परिवहन विभागाचे ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, शनिवारी पत्रकारांशी बोलताना परिवहन मंत्री यांनी पत्रकारांना सांगितले की कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर केएसआरटीसीचे कर्मचारी संपावर गेले आणि तो संपेपर्यंत महामारीची दुसरी लाट उसळली. त्यांनतर सेवा बंद ठेवण्यात आली.
दरम्यान, परिवहन विभाग महसूल तोटा सहन करत असूनही कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देत आहे. आर्थिक मागण्यांसाठी सरकारकडून सुमारे २६०० कोटी रुपयांचा लाभ घेण्यात आला आहे.
“सध्या ५० टक्के प्रवाशांना बससाठी परवानगी देण्यात आली आहे. मिळणारा महसूल इंधन आणि पगाराच्या मागण्यादेखील पूर्ण करणार नाही. पगारासाठी आम्हाला सरकारकडून पैसे घ्यावे लागतील आणि ते अपरिहार्य होते,” असे ते म्हणाले.
५ जुलैनंतर कर्मचारी संघटनांकडून संपावर जाण्याची धमकी देण्याबाबत ते म्हणाले की युनियन नेत्यांनी असे आश्वासन दिले आहे की या कठीण काळात आपण संपावर जाणार नाहीत. “चर्चेदरम्यान युनियन नेत्यांनी हे मान्य केले की आपण संपावर जात असलेल्या षडयंत्रांना बळी पडले आहेत. आता त्यांना सरकारशी हातमिळवणी करायची आहे,” असे उपमुख्यमंत्री म्हणाले.









